Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पिस्ता रंगाचा बॉडीकॉन ड्रेस, हातात फुलांचा गुच्छ..." प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं सुंदर प्रेग्नंसी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:06 IST

1 / 8
'कुबूल है' मालिकेतील 'झोया' या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच आई होणार आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये तिने पती सुमित सुरीसोबत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. सध्या ती आपल्या आयुष्यातील या नवीन आणि सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे.
2 / 8
सुरभीने नुकतेच तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने हे फोटोशूट रस्त्या कडेला असलेल्या एका फुलांच्या दुकानावर केले आहे. हातात फुले घेऊन बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
3 / 8
या फोटोशूटसाठी सुरभीने पिस्ता ग्रीन रंगाचा बॉडी फिटेड ड्रेस परिधान केला होता. मोकळे केस, गळ्यात नाजूक चेन, हिऱ्याचे कानातले आणि अत्यंत साधा मेकअप करून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
4 / 8
हे फोटो शेअर करताना सुरभीने कॅप्शनमध्ये 'Blessed beyond words' (शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतका आनंद) असे लिहिले आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
5 / 8
सुरभीने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सुमित सुरीसोबत लग्नगाठ बांधली होती. 'आज ही द मॅरेज मंत्रा' या म्युझिक व्हिडिओच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती, ज्याचे रूपांतर पुढे प्रेमात आणि लग्नात झाले.
6 / 8
आई होणार असल्याने सुरभीने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ती आपले संपूर्ण लक्ष नवीन पाहुण्याच्या स्वागतावर आणि स्वतःच्या आरोग्यावर केंद्रित करत आहे. तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सतत संवाद साधत असते.
7 / 8
सुरभी ज्योतीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिला १०.१ दशलक्ष (१०१ लाख) लोक फॉलो करतात. तिच्या प्रेग्नेंसी जर्नीमधील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
8 / 8
'कुबूल है'नंतर 'नागिन' सारख्या सुपरहिट मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी सुरभी आता खऱ्या आयुष्यात एका आईची जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीटेलिव्हिजनव्हायरल फोटोज्