By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:03 IST
1 / 9दिव्यांका त्रिपाठी हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ये है मोहोब्बते मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 2 / 9दिव्यांका लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 3 / 9अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया लग्नानंतर १० वर्षांनी आईबाबा होणार आहेत. नुकतंच दिव्यांकाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. 4 / 9तिच्या डोहाळजेवणाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिव्यांकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत आहे. 5 / 9बेबी शॉवरसाठी दिव्यांकाने खास लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. पारंपरिक पद्धतीने तिचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 6 / 9दिव्यांका आणि विवेक यांनी २०१६ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. दिव्यांकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 7 / 9 'बनू मे तेरी दुल्हन', 'क्राइम पेट्रोल', 'अदृश्यम', 'मिस्टर अँड मिसेस शर्मा', 'तेरे शहर में', कसम से या मालिकांमध्ये ती दिसली होती.8 / 9तर विवेकने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'ये है मोहोब्बते' मालिकेत त्या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. 9 / 9आता लग्नाच्या १० वर्षांनी त्यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन होणार आहे.