Join us  

'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 6:31 PM

1 / 8
झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहायाला मिळतंय.
2 / 8
मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांची मनं जिंकली आहेत.
3 / 8
या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर करतेच आहे पण त्यापाठोपाठ धनश्रीही म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली.
4 / 8
धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते.
5 / 8
काही दिवसांपूर्वी धनश्री ईशान्य भारतात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने या ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
6 / 8
तिने इंस्टाग्रामवर अरूणाचल प्रदेश व मेघालय येथील फोटोंसोबत मेघालयातील निसर्गाचा सुंदर फोटो शेअर करीत बालपणीच्या आठवणींना उजाळादेखील दिला होता. या व्हॅकेशनमधील फोटोत ती खूप सुंदर व ग्लॅमरस दिसत होती.
7 / 8
धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय.
8 / 8
टॅग्स :धनश्री काडगावकरतुझ्यात जीव रंगलाझी मराठी