Join us  

PICS : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सन्नीदानं घेतलं नवं घर; पाहा, सेलिब्रिटी कपलच्या गृहप्रवेशाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 3:03 PM

1 / 8
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस चांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीनं नवं घर खरेदी केलं आहे.
2 / 8
होय, या कपलचं नाव आहे राज हंचनाळे आणि मॉली डिसवाल या कपलने नुकतंच मुंबईत त्यांचं स्वप्नातलं घर खरेदी केलं. नुकतंच त्यांनी या नव्या घरात गृहप्रवेश केला.
3 / 8
राज आणि पत्नी मॉलीने यांनी सोशल मीडियावर नव्या घराच्या बाल्कनीतले दोन फोटो शेअर करत, ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
4 / 8
राज हंचनाळे याला तुम्ही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाहिलं असेलच. यातला राणादाचा भाऊ म्हणजेच राज हंचनाळे. होय, या मालिकेत त्याने सनी दाची भूमिका साकारली होती.
5 / 8
2019 मध्ये राज व मॉली यांनी लग्न केलं होतं. 2013 पासून दोघंही एकमेकांना ओळखत होते. मॉली ही हरयाणाची आहे.
6 / 8
लवकरच राज हंचनाळे एका नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘जीवाची होतिया काहिली’ या मालिकेतून पुन्हा पडद्यावर कमबॅक करत आहे.
7 / 8
‘जीवाची होतिया काहिली’ ही राजची नवी मालिका येत्या 18 जुलैपासून सुरू होतेय. यात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
8 / 8
या मालिकेत मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप पाहायला मिळणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारते आहे.
टॅग्स :राज हंचनाळे