Join us

ठरलं बाबा एकदाचं! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचे हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:03 IST

1 / 8
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचे हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.
2 / 8
अभिनेत्रीचे हळदीचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस मराठी' फेम रुचिरा जाधव आहे.
3 / 8
रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करत खास लूक केल्याचं दिसत आहे.
4 / 8
'में क़ैद हु…तेरे भी प्यार में तब से...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
5 / 8
रुचिरा या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'लग्न करतेस की काय...', 'ठरलं बाबा एकदाचं', 'तुझं लग्न आहे का?' अशा कमेंटही केल्या आहेत.
6 / 8
पण, रुचिरा खऱ्या आयुष्यात लग्न करत नाहीये. तर मालिकेत तिचं लग्न होत आहे.
7 / 8
रुचिरा 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत लावण्या ही भूमिका साकारत आहे. लावण्या आणि अर्णवची मालिकेत लगीनघाई सुरू असल्याचं दिसत आहे.
8 / 8
मालिकेच्या सेटवरील फोटो रुचिराने शेअर केले आहेत. पण 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत खरंच लावण्या आणि अर्णवचं लग्न होणार का? हे पाहणं रंजनकारक असणार आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह