Join us

Photos : पदरावर जरतारीचा मोर! तितीक्षा तावडे पैठणी साडीत दिसतेय कमालीची सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:33 IST

1 / 10
मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
2 / 10
तितीक्षा तावडे सध्या तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
3 / 10
तितीक्षा तावडे ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. नुकतंच तिने पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
काळ्या रंगाच्या पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. लूकला साजेशा मेकअपमुळे तितीक्षाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
5 / 10
यावेळी तिनं परिधान केलेल्या ज्वेलरीनं लक्ष वेधलं. तिनं पैठणीला साजेसा हार आणि झुमके परिधान केले. माथ्यावरील बिंदीनं तिचे सौंदर्य अधिकच खुलले.
6 / 10
या पैठणीच्या पदरावर मोर तर तिने परिधान केलेला फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज खूपच छान दिसत आहे.
7 / 10
तितीक्षा तावडेचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8 / 10
तिचा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
9 / 10
तितीक्षाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र, आता ही मालिका निरोप घेणार असल्याची माहिती आहे.
10 / 10
अभिनेत्रीचं 'तितीक्षा तावडे' या नावाने युट्यूब चॅनेल आहे. सध्या तिच्या या चॅनेलचे १ लाख ६७ हजारपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत
टॅग्स :तितिक्षा तावडेमराठी अभिनेतासेलिब्रिटी