Join us

'उंच माझा झोका'मधील चिमुरडी रमा झाली इतकी मोठी, आता तिला ओळखणं झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 11:41 IST

1 / 8
झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका ही एक दर्जेदार मालिका म्हणून ओळखली जाते. २०१२ ला सुरू झालेली ही मालिका साधारण वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
2 / 8
रमाबाई रानडे यांच्या जीवन गाथेवर आधारित असलेल्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चिमुरड्या रमाची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. तर मोठ्या रमाची भूमिका स्पृहा जोशीने निभावली होती.
3 / 8
उंच माझा झोका मालिकेत शैलेश दातार, विक्रम गायकवाड, कविता लाड, शरद पोंक्षे, शर्मिष्ठा राऊत, ऋग्वेदी प्रधान यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या निवडक कलाकारांचे रियुनियन पहायला मिळाले.
4 / 8
यावेळी दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी चिमुरड्या तेजश्रीला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आणलं. रमा आता मोठी झाली असे म्हणत त्यांनी एक खास सेल्फी शेअर केला होता.
5 / 8
मालिकेला दहा वर्षे पूर्ण होऊन काही काळ लोटला असून ही चिमुरडी आता कशी दिसते आणि ती काय करते याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. तेजश्री वालावलकर ही पुण्यात लहानाची मोठी झाली. पुण्यातील हुजूरपागा गर्ल्स हायस्कुल मधून तिने आपले शिक्षण घेतले आहे.
6 / 8
आजी आणि नात या चित्रपटातून तेजश्री वालावलकरने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटानंतर तेजश्री उंच माझा झोकामध्ये प्रमुख भूमिकेत झळकली. चिंतामणी चित्रपट आणि जिंदगी नॉट आऊट अशा आणखी काही मोजक्या प्रोजेक्टमधून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली.
7 / 8
तेजश्रीचा आताचा फोटो वीरेंद्र प्रधान यांनी शेअर करताच ही किती बदललीये अशा प्रतिक्रिया त्यांना मिळू लागल्या. तर काहींनी ती अजूनही तशीच क्युट दिसते असे म्हटले होते.
8 / 8
दरम्यान या मालिकेच्या म्युजिकल टीजर निमित्ताने कलाकारांची पुन्हा एकदा भेट घडून आली. यावेळी कलाकारांनी मालिकेतील जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला.