लग्नाआधीच प्रेग्नेंट होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, दोन वर्षात दोनदा केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 17:44 IST
1 / 8अभिनेत्रींनी लग्नाआधी आपली प्रेग्नेन्सी उघड केली नसली, तरी लग्नानंतर काही महिन्यांनी बेबी बंप दिसणे किंवा मुलाचे स्वागत करणे यातून त्यांचे सीक्रेट ओपन होते. अशी एक अभिनेत्री आहे जी तिच्या लग्नाआधीच प्रेग्नेंट होती आणि चक्क लग्नात आपल्या मुलासोबत होती.2 / 8टीव्हीशिवाय 'देवों के देव महादेव' या मालिकेतील 'पार्वती' या व्यक्तिरेखेने आपला ठसा उमटवणारी ही अभिनेत्री दक्षिण आणि बंगाली चित्रपटसृष्टीतही एक प्रसिद्ध नाव आहे.3 / 8ही अभिनेत्री म्हणजे पूजा बॅनर्जी. पूजा बॅनर्जी प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. 4 / 8ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. काही युजर्स तिला फोटोंवरून ट्रोलदेखील करतात. 5 / 8वास्तविक, पूजा बॅनर्जीने दोनदा लग्न केले आहे आणि दोन्ही वेळा तिने कुणाल वर्माशी लग्न केले आहे. यापूर्वी, २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान पूजा आणि कुणालने रजिस्टर लग्न केले होते.6 / 8 पूजा लग्नाआधीच गरोदर राहिली आणि रजिस्टर लग्नानंतर केवळ ६ महिन्यांनीच तिला मुलगा झाला. 7 / 8२०२१ मध्ये पूजा आणि कुणालने गोव्यात पुन्हा लग्न केले. या जोडप्याने बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि तोपर्यंत त्यांचा मुलगा एक वर्षाचा झाला होता.8 / 8पूजा बॅनर्जीचं पर्सनल लाइफ खूपच खडतर होते. वयाच्या १५व्या वर्षी ती घरातून पळून गेली होती. कोणाच्या तरी प्रेमात पडून तिने हे पाऊल उचलले होते. नंतर तिला खूप पश्चाताप झाला होता.