Join us
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:13 IST

1 / 7
सेलिब्रिटी फॅशन शोसाठी कायमच हटके लूक करताना दिसतात. सध्या एका अभिनेत्याचा फॅशन शोमधील लूक व्हायरल झाला आहे.
2 / 7
'ठरलं तर मग' फेम अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने त्याच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका फॅशन शोसाठी चैतन्यने हा खास लूक केला होता.
3 / 7
याचे फोटो अभिनेत्याने शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दिसतंय की चैतन्यने हिरव्या रंगाची पैठणी साडी लुंगी म्हणून नेसली आहे.
4 / 7
त्याने पिवळ्या रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट परिधान केला आहे. तर गळ्यात खड्यांचा मोठा नेकलेस घातला आहे.
5 / 7
कपाळावर त्याने चंद्रकोरही लावली आहे. चैतन्यने गळ्यात घातलेल्या नेकलेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 7
त्याचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोंवर कमेंट करत काहींनी चैतन्यचं कौतुक केलं आहे.
7 / 7
तर चैतन्याचा हा लूक काही चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाहीये. कमेंटमध्ये चाहत्यांनी 'पण का?', 'बाई हा काय अवतार', 'हे काय आहे', असंही काहींनी म्हटलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता