Join us
Daily Top 2Weekly Top 5

TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:01 IST

1 / 10
टीव्ही जगतात असे अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी छोट्या पडद्यावर नाव कमावल्यानंतर ते बॉलिवूडकडे वळले. मात्र, त्यापैकी काहींनाच यश मिळालं. असाच एक अभिनेता आहे ज्याने टीव्हीवर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर त्याची जादू चालली नाही.
2 / 10
हा अभिनेता म्हणजे टीव्हीचा डॅशिंग अभिनेता राजीव खंडेलवाल आहे. ज्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर त्याला 'कहीं तो होगा'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
3 / 10
राजीव त्याच्या पहिल्याच शोपासून रातोरात स्टार झाला. यानंतर त्याने 'क्या हदसा क्या हकीकत', 'सच का सामना', 'टाइम बॉम्ब 9/11', 'लेफ्ट राइट लेफ्ट' आणि 'रिपोर्ट्स' सारख्या अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केलं.
4 / 10
टीव्हीवर नाव कमावल्यानंतर राजीव बॉलिवूडकडे वळला. जिथे तो ११ वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र आजपर्यंत या अभिनेत्याला कोणत्याही चित्रपटातून चांगली कमाई करता आलेली नाही.
5 / 10
राजीव यांनी आतापर्यंत सुमारे ६ ते ७ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'आमिर', 'शैतान', 'साउंडट्रॅक', 'टेबल नंबर 21', 'फिव्हर' आणि 'प्रणाम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
6 / 10
राजीवने पुन्हा छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं आणि टीव्ही शो 'रिपोर्टर्स'मध्ये दिसला. या शोमध्ये त्याच्यासोबत कृतिका कामरा होती. पण ही जोडी प्रेक्षकांना प्रभावित करू शकली नाही आणि ७ महिन्यांतच शो बंद झाला.
7 / 10
राजीव खंडेलवाल ओटीटीकडे वळला आणि इथे लोकांना अभिनेत्याचे दमदार पात्र खूप आवडले. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा काजोलसोबत 'सलाम वेंकी'मध्ये दिसला होता.
8 / 10
राजीव 'ब्लडी डॅडी' आणि 'शोटाइम' सारख्या ओटीटी शोमध्ये दिसला आहे, ज्यामध्ये त्याने इमरान हाश्मी आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
9 / 10
राजीव खंडेलवालचे असंख्य चाहते आहेत. अभिनेता सोशल मीडियावर एक्टिव्ह असून त्याचे फोटो शेअर करत असतो.
10 / 10
टॅग्स :राजीव खंडेलवाल