By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:54 IST
1 / 7मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. लग्नानंतर आता दोघं हनिमूनसाठी लंडनला गेले आहेत. 2 / 7तेजस्विनीने आता लंडनमधील काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. समाधान यांच्यासोबत ती रोमँटिक पोज देत आहे. नवऱ्यासोबत ती मनसोक्त लंडन फिरत आहे. 3 / 7तसंच आता सगळीकडेच ख्रिसमसचा उत्साह आहे. लंडनही ख्रिसमसच्या सजावटीत सजलं आहे. याची झलक तिने फोटोंमधून दाखवली आहे.4 / 7तेजस्विनीच्या या फोटो अल्बममधून लंडनमधल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळांची झलक दिसत आहे. तसंच तेजस्विनी आणि समाधान एकमेकांचा हातात हात पकडून चालत आहेत.5 / 7लंडनच्या प्रसिद्ध वॉच टॉवरसमोरुनही तिने फोटो शेअर केला आहे. समाधान यांचा हात धरुन ती प्रेमाने त्यांच्याकडे पाहत आहे. पिंक जॅकेटमध्ये ती क्युट दिसत आहे.6 / 7प्रसिद्ध लंडन ब्रिजवरूनही दोघांनी फोटोशूट केलं आहे. कधी सिंगल तर कधी एकमेकांसोबत त्यांनी पोज दिली आहे. 7 / 7तेजस्विनी नवऱ्यासोबत एकदम खूश दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचा ग्लोही स्पष्ट दिसत आहे. घाऱ्या डोळ्यांमुळे तिने आधीच अनेकांना घायाळ केलंच आहे.