By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 13:31 IST
1 / 9‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील रिटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहुजा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे.2 / 9 होय, प्रियाने पती मालवा राजदा यांच्यासोबत पुन्हा एकदा लग्न केलं. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.3 / 919 नोव्हेंबर रोजी प्रिया आणि मालव राजदा यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली. लग्नाचा वाढदिवस प्रिया व मालव यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.4 / 9दोघांनीही पुन्हा एकदा सर्व रिजीरिवाजाने लग्नगाठ बांधली. आईबाबांच्या लग्नात दोघांच्या 2 वर्षाच्या मुलानेही धम्माल केली. लग्नाच्या 8 वर्षानंतर म्हणजेच 2019 मध्ये प्रियाने मुलाला जन्म दिला होता.5 / 9लग्नाचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.‘परिंची कहाणी खरी झाली’, असे कॅप्शन प्रियाने दिले आहे.6 / 9या लग्नाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अख्खी टीम हजर होती. या सर्वांनी प्रिया व राजदा यांच्या लग्नात धम्माल मस्ती केली.7 / 9प्रियाने 2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले. त्या दोघांची ओळख ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.8 / 9प्रियाने अलीकडे तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि हे फोटो पाहून ट्रोलर्सने तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती. या फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली आणि अनेकांनी यावरून प्रियाला ट्रोल केले होते.9 / 9फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली म्हणून लोकांनी प्रियाला नको ते ऐकवले. इतके की, लोकांच्या कमेंट वाचून तिचा पती मालव राजदाही संतापला होता.