'तारक मेहता..'मधील 'गुलाबो' सध्या काय करते? थेट सलमान खानशी घेतलेला अभिनेत्रीने पंगा
By देवेंद्र जाधव | Updated: March 28, 2025 15:20 IST
1 / 7'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील गुलाबो प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. जेठालालची दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या गुलाबोचा ट्रॅक मालिकेत चांगलाच गाजला2 / 7गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली. सिंपलची 'तारक मेहता..'मधील भूमिकेने चांगलीच गाजली. सिंपल सध्या काय करते, याविषयी जाणून घ्या3 / 7सिंपल सध्या तरीही कोणत्याही मालिकेत किंवा इतर शोमध्ये काम करत नाहीये. सिंपलची मुंबईत ३ रेस्टॉरंट असल्याचं समजतंय.4 / 7सिंपलने थेट बॉलिवूड अभिनेता सलमान खानशीही पंगा घेतला होता. बिग बॉसच्या १२ व्या सीझनमध्ये सलमानने करणवीर बोहराला सुनावलं होतं.5 / 7करणवीर हा सिंपलचा मित्र असल्याने तिला सलमानचा राग आला होता. तिने ट्विटरवर सलमानवर राग व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती.6 / 7सिंपल कौल रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. २०१० ला सिंपलने राहुल लूंबासोबत लग्न केलं.7 / 7सिंपल कौल सध्या कोणत्याही टीव्ही प्रोजेक्ट आणि मालिकेत दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. सिंपलचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.