Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुष्मिता सेनच्या भावाचे Intimate फोटो लिक, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान राजीव सेनचे फोटो पुन्हा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 13:26 IST

1 / 8
सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी टीव्ही अभिनेत्री चारु असोपा यांच्या नात्याची चर्चा जोरदार होत असते. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच नुकतेच त्यांना एका फॅमिली फंक्शनमध्ये बघितले गेले.
2 / 8
राजीव सेन आणि चारु असोपा आधी एकमेकांना डेट करत होते. मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. यानंतर अचानक दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. मात्र तरी त्यांचे नाते टिकू शकलेले नाही. त्यांनी घटस्फोट घेतल्याचीही बातमी आली.
3 / 8
अनेकदा दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप लावले आहेत. तर आता नुकतेच चारु आणि राजीवचे वाईन डेट चे फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चारुने आधीच हे फोटो पोस्ट केले होते मात्र ट्रोल झाल्याने तिने ते डिलीट केले.
4 / 8
त्यांचे हे फोटो खूपच खाजगी क्षणांचे दिसत असून ते तुफान व्हायरल झाले होते. दोघांनी ते आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. ट्रोलिंग झाल्यानंतर त्यांनी ते डिलीट केले.
5 / 8
चारुने नंतर खुलासा केला की पती राजीव सेन सोबत फोटो शेअर करण्यावरुनच त्यांच्यात भांडणं झाली. त्यांचे हनिमूनचेही cosy फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
6 / 8
चारुने एका मुलाखतीत सांगितले, 'मी राजीवला फोटो शेअर करायला नको असे सांगितले होते. कधी कधी आपण जे अनुभवतो तेच आपण शेअर करतो. कोणताही फोटो शेअर करताना आम्ही चर्चा करत नाही. पण आम्ही तर ट्रोल झालो.'
7 / 8
राजीवचे दुसऱ्याच मुलीसोबत अफेअर सुरु होते मात्र मी त्यांना रंगेहात पकडू शकले नाही असाही आरोप चारुने केला होता. इतकंच नाही तर त्यांने कौटुंबिक हिंसाचारही केल्याचं तिने म्हणलं आहे.
8 / 8
राजीवचे दुसऱ्याच मुलीसोबत अफेअर सुरु होते मात्र मी त्यांना रंगेहात पकडू शकले नाही असाही आरोप चारुने केला होता. इतकंच नाही तर त्यांने कौटुंबिक हिंसाचारही केल्याचं तिने म्हणलं आहे.
टॅग्स :सुश्मिता सेनव्हायरल फोटोज्सोशल मीडिया