पुण्याची लेक होणार बांदेकरांची सून? पूजा बिरारीबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:04 IST
1 / 9मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंब असलेल्या बांदेकरांच्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 2 / 9सुचित्रा बांदेकर यांनीही लेकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं आहे. पण, बांदेकरांची होणारी सून आहे तरी कोण? 3 / 9सोहम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत. 4 / 9पूजा हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 5 / 9पूजा मुळची पुण्याची असून ती २९ वर्षांची आहे. 6 / 9स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत पूजाने मुख्य भूमिका साकारली होती. 7 / 9याआधी साजणा या मालिकेतही ती प्रमुख भूमिकेत होती. 8 / 9पूजा सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 9 / 9पूजाचा चाहता वर्ग मोठा असून तिचे इन्स्टाग्रामवर २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.