Join us
Daily Top 2Weekly Top 5

मरणाच्या दारातून परत आलाय RJ सुमित, दोन्ही किडन्या झालेल्या शट डाऊन; म्हणाला- "लघवीतून रक्त येत होतं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:06 IST

1 / 12
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लोकप्रिय आरजे असलेला आरजे सुमित गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला नेमकं काय झालं होतं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.
2 / 12
सुमित एका मोठ्या संकटातून थोडक्यात बजावला आहे. त्याने गंभीर आजाराचा सामना करत त्यावर मात केली आहे. नेमकं काय घडलं होतं आणि आता त्याची प्रकृती कशी आहे हे त्याने व्हिडीओतून सांगितलं आहे.
3 / 12
सुमितच्या दोन्ही किडन्या शट डाऊन झालेल्या. त्याला डॉक्टरांनी जगण्याचीही गॅरंटी दिली नव्हती. पण, ताबडतोब योग्य ते उपचार केल्याने तो या आजारातून वाचला आहे.
4 / 12
सुमित म्हणाला, 'भरपूर लोकांनी मला विचारलं की, तुला काय झालं होत? माझ्या किडन्या शट डाऊन झाल्या होत्या. कारण माझं पोट्याशिअम लेव्हल ६.५ झालं होत, क्रिएटिन(creatinine) लेव्हल २३.५ झालं होतं'.
5 / 12
'१.२ हे नॉर्मल असतं. ५-६ क्रिएटिन लेव्हल असेल तरी पेशन्ट कोमात जातो, असं डॉक्टरांनी सांगितलं होत. आणि माझं तर २३.५ इतकं होत. त्यामुळे जगण्याची गॅरेंटी दिली नव्हती'.
6 / 12
'डॉक्टरांनी त्वरित डायलेसिस करण्यास सांगितलं. माझ्या ४ डायलेसिस झाल्या आणि १ बायोप्सी झाली. त्यानंतर माझे रिपोर्ट्स आता नॉर्मल आहेत. डिहायड्रेशनमुळे माझी किडनी ड्राय झाली होती. आणि किडनीच्या ट्यूबमध्ये जखम झाली असल्यामुळे ते ब्लॉक झालं होतं'.
7 / 12
'त्यामुळे किडनीला काहीच फिड होत नव्हतं. युरीन पास होत नव्हतं आणि झालंच तरी त्यातून रक्त जात होतं. किडनी फिल्टर करत नव्हती. म्हणून इमर्जन्सीमध्ये डायलेसिस केलं गेलं. २३.५ म्हणजे पेशंट गेल्यात जमा असतो...'
8 / 12
'मला डॉक्टरांनी सांगितलेलं की, आताच्या आता डायलेसिस नाही केलं तर, कोमात जाऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो नाहीतर अचानक मृत्यू होऊ शकतो'.
9 / 12
'पण, देवाची कृपा, आई-वडिलांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम यामुळे मी वाचलोय आणि या सगळ्यातून बाहेर आलोय'.
10 / 12
'माझं वजन कमी झालंय. जवळपास १३-१४ किलो वजन कमी झालंय. पण रिकव्हर व्हायला एक ६ महिने लागतील असं डॉक्टर म्हणाले आहेत. पथ्य आहे भरपूर. ते पथ्यही पाळतो'.
11 / 12
'मला फक्त एवढंच म्हणायचंय की, जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल तेव्हा फक्त ब्लड टेस्ट न करताना किडनीसुद्धा तपासली पाहिजे'.
12 / 12
'तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहूदे. अजूनही चाललं किंवा जास्त बोललो तर धाप लागते', असं म्हणत त्याने लवकरच पुन्हा भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकार