Join us

कार्तिकी गायकवाडच्या भावाचं शुभमंगल सावधान! गायिकेने शेअर केले लग्नातील खास क्षणांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:14 IST

1 / 7
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रसिद्धीझोतात आलेली गायिका कार्तिकी गायकवाडचा भाऊ कौस्तुभ लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
2 / 7
कौस्तुभने काव्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
3 / 7
कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कौस्तुभ आणि काव्याचा विवाहसोहळा पार पडला. कार्तिकीने त्यांच्या साता जन्माची गाठ बांधली.
4 / 7
विवाहसोहळ्यासाठी कौस्तुभ आणि काव्याने पारंपरिक पेहराव केला होता. तर कार्तिकीनेही मराठमोळा साज केला होता.
5 / 7
पांढऱ्या रंगाची पैठणी आणि त्यावर हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज तिने घातला होता.
6 / 7
कपाळावर चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि भरजरी दागिने घालत कार्तिकी नटली होती.
7 / 7
कार्तिकीने भावाच्या लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. त्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट करत चाहत्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग