"मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण...", १९ वर्षांचा संसार मोडल्यानंतर पतीचं झालेलं निधन; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:50 IST
1 / 9'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे नुकतीच बाहेर पडली. अंगुरी भाभी भूमिकेतून तिने सर्वांचं मन जिंकलं. मात्र आता मालिकेत ओरिजिनल अंगुरी भाभी शिल्पा शिंदे परत आली आहे.2 / 9काही वर्षांपूर्वी शुभांगीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं. तिचा १९ वर्षांचा संसार मोडला. पियुष पोरेसोबत तिने घटस्फोट घेतला. पियुषला दारुचं व्यसन होतं ज्याला शुभांगी शेवटी कंटाळली होती. 3 / 9घटस्फोटानंतर काही महिन्यातच पियुषचं निधन झालं. सध्या शुभांगी एकटीच कामासोबतच लेकीला सांभाळ करते. याविषयी नुकतंच एका मुलाखतीत तिने भावना व्यक्त केल्या.4 / 9विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी अत्रे म्हणाली, ' मी सिंगल मदर आहे. इथे मी एकटीच राहते मला एकत्र अनेक गोष्टी सांभाळायच्या असतात. माझे आईवडील येऊ शकत नाहीत. कारण वडील कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यामुळे एकटीने एवढ्या गोष्टी मॅनेज करणं कठीण होतं.'5 / 9'महिला खूप भावनिक असतात. मी कधीच कोणत्या गोष्टीला अर्ध्यात सोडत नाही. नंतर मला असं वाटलं नाही पाहिजे की अरे मी प्रयत्न केला नाही.'6 / 9'आज मी आत्मविश्वासाने बोलू शकते कारण मी नातं वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पियुषला दारुचं व्यसन होतं. त्याचं ते व्यसन सोडवण्यासाठी मी त्याला खूप मदत करत होते. काऊंसिलिंग, नशामुक्ती केंद्र असं सगळंच केलं.'7 / 9'मला आता पियुषकडूनही काहीच तक्रार नाही. मला अभिनयासाठी त्याने कायम पाठिंबा दिला होता. सासरच्या मंडळींनीही सपोर्ट केला. आम्हाला गोंडस मुलगी आशी झाली. आज तो जिथे कुठे असेल तिथे खूश असू दे. आशी आणि माझ्यावर त्याचा आशीर्वाद असाच असू दे.'8 / 9'मधल्या काळात मी नैराश्यात होते. माझी कोणालाच भेटायची इच्छा नव्हती. पण मी कामावर याचा परिणाम होऊ दिला नाही.'9 / 9पुन्हा लग्न करणार का? यावर शुभांगी म्हणाली, 'सध्या असा काहीच विचार नाही. पुन्हा लग्न करण्याबद्दल मला बहिणी नेहमी सांगतात. पण सध्या माझा असा विचार नाही. आत्ता मला माझ्या लेकीकडेच लक्ष द्यायचं आहे.'