शिवानी झाली गणपुळेंची सून! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, पाहा व्हेडिंग अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:01 IST
1 / 9गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) लग्नाची जोरादार चर्चा सुरु होती. त्यांच्या लग्नाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते.2 / 9अखेर २१ जानेवारी २०२५ रोजी या दिवशी अंबर आणि शिवानी लग्नबेडीत अडकले आहेत. आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केलीय. 3 / 9शिवानी आणि अंबरच्या लग्नाचा अल्बम सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 4 / 9गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. 5 / 9अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली होती. आता त्यांचा लग्नसोहळा थाटामाटात पडला आहे. 6 / 9आपल्या लग्नासाठी दोघांहीनी सुंदर अशी वेशभूषा केली आहे. शिवानीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर नाकात नथ, गळ्यात नेकलेस घालून लूक पूर्ण केलाय. तसेच तिने आबोली रंगाचा शेला घेतलाय.7 / 9अंबरने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेऊन लग्नात खास लूक केला आहे. या नवोदित जोडप्यावर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 8 / 9शिवानी सोनारने 'राजा राणीची गं जोडी' 'तू भेटशी नव्याने' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 9 / 9तर अंबर गणपुळेने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळालीय.