Join us  

शेवंता खुश्श...! अपूर्वा नेमळेकरने केले झक्कास सेलिब्रेशन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 1:11 PM

1 / 10
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची व्यक्तिरेखा साकारली होती.
2 / 10
‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका कधीच संपली. पण चाहते शेवंताला विसरलेले नाहीत. हीच शेवंता अर्थात अपूर्वा सध्या सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. आता सेलिब्रेशन कसले तर ‘500 के फॅमिली’त सामील झाल्याचे. अपूर्वाने ‘500 के फॅमिली’त सामील झाल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
3 / 10
‘500 के फॅमिली’ ही काय भानगड हे अद्यापही तुम्हाला समजले नसेल तर आम्ही सांगतो. तर अपूर्वाने सोशल मिडियावर पाच लाख फॉलोअर्सचा टप्पा पुर्ण केला आहे. यावेळी तिने सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.
4 / 10
पाच लाख फॉलोअर्सचा टप्पा पुर्ण केल्यानंतर अपूर्वाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही माझे सर्वात मोठे समर्थक, प्रशंसक आहात. खूप सारे प्रेम आणि आभार, असे तिने लिहिले आहे.
5 / 10
कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते.
6 / 10
अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.
7 / 10
अपूर्वाने इव्हेंट मॅनेजरमेंट कंपनीद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यापूर्वीच अभिनयातही एन्ट्री केली होती. आभास हा या मालिकेची ऑफर स्वीकारल्यानंतर एकीकडे स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि दुसरीकडे अभिनय अशी तिची कसरत सुरु होती.
8 / 10
अपूर्वा एक उद्योजिकादेखील आहे. 2015 साली अपूर्वाने तिच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड बाजारात उतरवला होता. ‘अपूर्वा कलेक्शन’ असे तिच्या ज्वेलरी ब्रँडचे नाव आहे.
9 / 10
अपूर्वाला कार चालवायला प्रचंड आवडते. एकटीला भटकायलाही खूप आवडते. अपूर्वा आपली कार घेऊन देशभरात अनेक ठिकाणी एकटी फिरली आहे.
10 / 10
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने 7 ते 8 किलो वजन वाढवले होते.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकर