Join us  

गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली..!, सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:27 AM

1 / 12
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असून सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळत आहे.
2 / 12
मात्र ही लगीनघाई सायलीची नसून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका शुभमंगल ऑनलाईनमधील शर्वरीची आहे.
3 / 12
लवकरच शर्वरी आणि शंतनू लग्नबेडीत अडकताना दिसणार आहेत.
4 / 12
शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू - शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत.
5 / 12
शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे. अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खुश आहेत.
6 / 12
घरच्या घरी नुकतेच मेहंदी सेरेमनी पार पडली.
7 / 12
पण, माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाहीये. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे.
8 / 12
जगदीशने माधुरीला सगळं काही सुरळीत सुरू असताना आता मिठाचा खडा टाकलास तर मी तुला घटस्फोट देईन अशी सक्त ताकीद दिली आहे
9 / 12
पण माधुरी यामधील कुठलीच गोष्ट शर्वरीला सांगू शकत नाही.
10 / 12
शर्वरीच्या हळदीचे फोटो सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.
11 / 12
प्रेक्षक शर्वरी आणि शंतनूचा विवाह सोहळा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
12 / 12
शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढणार आहे, लग्नाच्या पवित्र बंधनात शंतनू – शर्वरी जोडले जाणार आहेत.
टॅग्स :सायली संजीव