Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sayali Sanjeev : अतिसुंदर ! कहर केलात मॅडम...अभिनेत्री सायली संजीवच्या लुकवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:30 IST

1 / 8
'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सायली संजीव सध्या माहाराष्ट्राची क्रशच बनली आहे. तिचे वेगवेगळे लुक चाहत्यांना घायाळ करत आहेत.
2 / 8
नाशिकची सायली संजीव नेहमी साध्या, सालस, सोज्वळ लुकमध्ये दिसते. तिचा हा साधा स्वभाव चाहत्यांनाही फारच भावतो.
3 / 8
झिम्मा आणि नंतर गोष्ट एका पैठणीची या सिनेमांमधून ती चाहत्यांच्या भेटीला आली. झिम्मा मध्ये तिचा बोल्ड आणि बिंधास्त लुक होता तर गोष्ट एका पैठणीची मध्ये तिने अतिशय सोज्वळ भूमिका साकारली होती.
4 / 8
आता तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो अपलोड केले आहेत. यात तिने खणाचा ब्लाऊज घातला आहे. तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
5 / 8
जांभळ्या रंगाचा खणाचा ब्लाऊज आणि गुलाबी रंगाची साडी, झुमके यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. केस मोकळे सोडले असून एका फोटोत कानामागे छानसे फूल लावले आहे.
6 / 8
कहरच केलात मॅडम, इतक्या सुंदर दिसत आहात, कितना हसीन चेहरा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 8
सायलीला नेहमी भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड वरुनही चिडवले जाते. तिच्या याही फोटोंवर ऋतूराजचा बॅटिंग फॉर्म आणि सायलीचे फोटो यावरुन कोणीच नजर हटवू शकत नाही अशी कमेंट एकाने केली आहे.
8 / 8
सायलीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. तिचे सध्या इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :मराठी अभिनेतासायली संजीवइन्स्टाग्रामव्हायरल फोटोज्