सावंतवाडीचा पॅलेस अन् 'देवमाणूस'च्या लग्नाचा थाट, किरण-वैष्णवीच्या शाही विवाह सोहळ्याचे पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:41 IST
1 / 9'देवमाणूस' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाडने नुकतीच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.2 / 9किरण आणि वैष्णवी यांनी १४ डिसेंबर, २०२४ रोजी सावंतवाडी पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे. 3 / 9किरण-वैष्णवीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 4 / 9किरण-वैष्णवीच्या लग्नाला मराठी मालिका विश्वातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. त्यांनी या लग्नात चांगलीच धमालमस्ती केली.5 / 9किरण आणि वैष्णवी लग्नात खूपच सुंदर दिसत होते. दोघांनीही हटके पोषाख निवडला होता. 6 / 9वैष्णवीने लग्नासाठी जांभळ्या रंगाची नववारी नेसली होती तर किरण पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. 7 / 9१३ डिसेंबर रोजी किरण-वैष्णवीचा सकाळी साखरपुडा झाला. त्यानंतर हळद आणि रात्री संगीत सेरेमनी पार पडले.8 / 9किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरची पहिली भेट 'देवमाणूस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.9 / 9किरणने मालिकेसोबत सिनेमातही काम केले आहे. तर वैष्णवीने मालिकेत काम केले आहे. सध्या ती तिकळी मालिकेत काम करते आहे.