Join us

'सावळ्यांची जणू सावली' फेम अभिनेत्री मेघा धाडेच्या लेकीपुढे मॉडेल्सही पडतील फिक्या, आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:34 IST

1 / 10
अभिनेत्री मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचली. ती 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. मेघाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
2 / 10
मेघाने मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडली आहे. यासोबतच ती राजकारणातही सक्रीय आहे.
3 / 10
सध्या ही अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सावळ्याची जणू सावली'मध्ये दिसत आहे.
4 / 10
अभिनेत्रीप्रमाणेच तिची लेकही मल्टीटॅलेंडेट आहे आणि ती लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्या लेकीचे नाव साक्षी पावसकर असून तीदेखील आईप्रमाणेच सुंदर आहे.
5 / 10
नुकतीच मेघा आणि साक्षीने मी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. यावेळी मेघाने व्हाइट रंगाचा लाँग वन पीस परिधान केला होता. तर साक्षीने व्हाइट रंगाचा क्रॉप टॉप त्यावर ब्लेझर आणि डेनिमचा शॉर्ट स्कर्ट परिधान केला होता.
6 / 10
या इव्हेंटमध्ये साक्षीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. यावेळी पापाराझीने तिचे टिपलेले क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 10
साक्षीला शाळेत असल्यापासूनच चित्रकलेची आवड होती. दहावीनंतर तिने फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने सिनेमा निर्मितीचे धडे गिरवले. हे धडे गिरवल्यानंतर साक्षीने एक शॉर्टफिल्म बनवली होती, ज्यात मेघा धाडेने मुख्य भूमिका साकारली होती.
8 / 10
अभिनेते अनुपम खेर यांच्या ॲक्टिंग स्कूलमधून साक्षीने अभिनयाचा डिप्लोमा देखील केला आहे.
9 / 10
गेल्या वर्षभरात साक्षीने रिसॉर्टचा व्यवसायदेखील सांभाळला आहे. इतकेच नाही तर ती केक, कुकीजसारखे बेकरी प्रॉडक्ट्स देखील उत्तम बनवते. भविष्यात काही झाले नाही तरी ती स्वतःची बेकरी सुरू करू शकेल आणि तो व्यवसाय ती उत्तम सांभाळेल असा विश्वास मेघा धाडे यांना आहे.
10 / 10
रिसॉर्टच्या कामकाजामुळे साक्षीचे अभिनयाकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र, तिचे बॉलिवूडसाठी ऑडिशन देणे सुरू आहे. त्यामुळे लवकरच साक्षी बॉलिवूडमध्ये दिसू शकते.
टॅग्स :मेघा धाडे