सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम 'अद्वैत' करतोय 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट; अभिनेत्रीने गाजवलेलं मराठी Bigg boss
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 11:59 IST
1 / 10आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असता. ते कुठे रहातात, त्यांच्या कुटुंबात कोणकोण लोक आहेत. ते कोणाला डेट करतायेत हे जाणून घेण्याची उत्सुकता असतात. (Photo Instagram) 2 / 10आज आम्ही तुम्हाला झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अव्दैतच्या पर्सनल आयुष्याबाबत सांगणार आहोत. (Photo Instagram) 3 / 10अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरे मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्रील डेट करतोय. (Photo Instagram) 4 / 10अजिंक्य ननावरे सध्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अद्वैतची भूमिका साकारतो आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळते आहे. (Photo Instagram) 5 / 10अजिंक्यने याआधी 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'सख्या रे', 'गर्ल्स हॉस्टेल' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. (Photo Instagram) 6 / 10अजिंक्य गेल्या आठ वर्षांपासून अभिनेत्री शिवानी सुर्वेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. बिग बॉस मराठीच्या घरात प्रचंड राडे करणाऱ्या शिवानीने याच घराक किशोरी शहाणेसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. (Photo Instagram) 7 / 10 तू जीवाला गुंतवावे या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram) 8 / 10शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या बॉयफ्रेंड अजिंक्यसोबतचे फोटो शेअर करत असते.(Photo Instagram) 9 / 10'देवयानी', 'बिग बॉस मराठी' अशा गाजलेल्या मालिका, कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे.(Photo Instagram) 10 / 10उत्तम अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळेही शिवानीने कलाविश्वात तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. (Photo Instagram)