Join us

सुंदरा भरेल मनात! आरजे महवशचा नवरात्री स्पेशल लूक, फोटो चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:19 IST

1 / 10
नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण आपल्या परीने हा उत्सव साजरा करतो. नवरात्रोत्सवात गरबा नृत्याचं विशेष आकर्षण असतं. नुकतंच आरजे महवश ही गरबा लूकमध्ये दिसली.
2 / 10
आरजे महवशनं इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिनं 'संस्कार आणि बंदूक दोन्ही ठेवते' असं कॅप्शन दिलं.
3 / 10
हा हटके लुक कॅरी करण्यासाठी तिनं ब्राऊन बेसची निवड केली होती. यावेळी तिने ब्राऊन रंगाची सिंपल लिपस्टिक लावून आयशॉडो, काजळ लावून तिचा लुक पूर्ण केला.
4 / 10
या खास लूकसाठी आरजे महवशनं कानात झुमके, हातात बांगड्या व गळ्यात सुंदर दागिने परिधान केले होते. ज्यामुळे तिचा लूक अधिकच आकर्षण दिसत होता.
5 / 10
लाल आणि काळ्या रंगाच्या पारंपरिक घागरा-चोळीमध्ये आरजे महवश खूपच उठावदार दिसली.
6 / 10
आरजे महवश हिचा हा लूक गरबा नाईटसाठी हा एक परफेक्ट आहे.
7 / 10
तिचा हा पाठमोरा फोटो तर हटके आणि बोल्ड दिसतोय. ज्यामुळे तिच्या घागऱ्याला रॉयल लुक मिळालाय.
8 / 10
आरजे महवशच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
9 / 10
धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल हा आरजे महवशला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
10 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरजे महवश २८ वर्षांची आहे. तिनं रेडिओ जॉकी म्हणून काम केलंय. तसेच ती अभिनेत्री, कंटेंट क्रिएटर, लेखक आणि होस्टसुद्धा आहे.
टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५सेलिब्रिटीटिव्ही कलाकार