Join us

Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:59 IST

1 / 8
अपूर्वा मखीजा ही समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमधून चर्चेत आली होती. आता ती द ट्रेटर्समध्ये दिसत आहे.
2 / 8
अपूर्वा २३ वर्षांची आहे आणि आता तिला लग्न करायचंय. पूरव झासोबत तिचं नाव जोडलं गेलं. मात्र तिने असं काहीच नसल्याचं म्हटलं आहे.
3 / 8
पापाराजी अकाऊंट वरिंदर चावलाला तिने इंटरव्ह्यू दिला. तिला तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल काय प्लॅन आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता.
4 / 8
'मला लग्न करायचं आहे, प्लीज कोणीतरी माझं लग्न लावून द्या. कारण मला आणखी व्हिडीओ बनवायचे नाहीत. मी थकली आहे. रिअॅलिटी शो करावा असं मला वाटत नाही.'
5 / 8
'मला आता थोडा वेळ धीराने काम करावं लागेल. मला फक्त आता लग्न करायचं आहे. मी सिंगल आहे.मी कोणाशी बोलतही नाही.'
6 / 8
'मी बॉयफ्रेंड शोधतेय, मला वाटतंय की मी स्वयंवर करावं. जिथे माझा थोडासा का होईना कंट्रोल असेल' असं अपूर्वा मखीजाने म्हटलं आहे.
7 / 8
अपूर्वा मखीजा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अपूर्वाचे असंख्य चाहते आहेत.
8 / 8
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन