1 / 7एक मराठी अभिनेत्री आई होणार आहे. या अभिनेत्रीला आपण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. या अभिनेत्रीचं नाव आहे मंगल राणे2 / 7अभिनेत्री मंगल राणेने सोशल मीडियावर डोहाळेजेवणाचे फोटो शेअर केले आहेत. मंगलसोबत तिचा पती संतोष पेडणेकर पाहायला मिळतो.3 / 7डोहाळेजेवणाच्या प्रसंगी मंगलचे अनेकांनी लाड केेले. याशिवाय गोडधोड भरवून तिचं कौतुक केलं.4 / 7मंगलचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक या आनंदाच्या क्षणी तिच्यासोबत उपस्थित होते. मंगलने सर्वांसोबत फोटो काढून आनंद साजरा केला.5 / 7मंगलला आपण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत पाहिलंय. मंगलच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं6 / 7'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर मंगलने 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा', 'संत गजानन शेगावीचे' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय काही नाटकांमधून आणि सिनेमांमधूनही मंगल झळकली.7 / 7मंगलचे पती संतोष पेडणेकर हे पेशाने फोटोग्राफर आहेत. २०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात मंगल आणि संतोष यांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर आता हे दोघे पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.