Ragini Khanna : "माझी इज्जत शून्य झाली असती"; गोविंदाच्या भाचीचा स्ट्रगल, अभिनेत्रीने का मागितलं नाही काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:28 IST
1 / 10गोविंदाची भाची रागिनी खन्नाने टीव्हीवर हिट शो केले आहेत. पण काही काळ प्रसिद्धीच्या झोतात राहिल्यानंतर ती आता स्क्रीनवर कमी दिसू लागली आहे.2 / 10रागिनीचा मामा गोविंदा मोठा स्टार आहे. फिल्मी बॅकग्राऊंड असूनही रागिनी एक यशस्वी हिरोईन बनू शकली नाही.3 / 10हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत रागिनीला विचारण्यात आलं की गोविंदाची भाची असूनही संघर्ष करावा लागला. फक्त एका कॉलने ती तिचं करिअर सुधारू शकली असती. तिने हे का केलं नाही?4 / 10प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'मी सर्वप्रथम प्रवीण खन्नाची मुलगी आहे. मग कामिनी खन्नाची. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे.'5 / 10'मी प्रगती करेन तेव्हाच त्यांना मी त्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटेल. मी खूप शार्प आहे.' 6 / 10'जर एक फोन केला असता तर माझ्या पालकांच्या नजरेत माझा इज्जत शून्य झाली असती. मी ते सहन करू शकत नाही.'7 / 10'एकतर तुम्हाला पैसे कमवावे लागतील, तुम्हाला काम करावं लागेल किंवा तुम्हाला काहीतरी साध्य करावं लागेल.' 8 / 10'त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. फोन करून काम मागितल्यास तुम्हाला १ चित्रपट मिळेल. पुढे काय?'9 / 10'लोक माझ्यासाठी किती फोन करतील? एका फोन कॉलमुळे तुम्ही येत आहात म्हणून प्रेक्षक तुम्हाला बाजूला करतील' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.10 / 10ससुराल गेंदा फूल, भास्कर भारती, राधा की बेटियां कुछ कर दिखायेंगी या मालिकांव्यतिरिक्त, रागिनीने रिएलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.