Join us

आई तशी मुलगी! प्रतिक्षा लोणकर यांच्या लेकीचं निरागस सौंदर्य, नावही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:03 IST

1 / 7
प्रतिक्षा लोणकर (Pratiksha Lonkar) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा. १९९७ साली आलेल्या 'दामिनी' मालिकेतील भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.
2 / 7
प्रतिक्षा लोणकर या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत. अभिनयातील करिअरसाठी त्या मुंबईत आल्या आणि कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं.
3 / 7
मराठी रंगभूमीवरुन त्यांनी आपल्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. 'अर्थ' हे त्यांचं मराठी नाटक आजही अनेक प्रेक्षकांच्या मनाच्या कोपऱ्यात आहे. सौ. कुमूद प्रभाकर आपटे हेही आणखी एक अफलातून नाटक.
4 / 7
प्रतिक्षा लोणकर यांनी मराठी, हिंदी सिनेमेही गाजवले. 'इकबाल', 'एवढेसे आभाळ', 'आशायें', 'मोकळा श्वास' यासह अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं.
5 / 7
प्रतिक्षा लोणकर यांनी १९९० साली लेखक, नाटककार प्रशांत दळवी यांच्याशी लग्नगाठ बांधली. दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर होतं.
6 / 7
त्यांना एक मुलगी आहे. रुंची असं तिचं नाव आहे. आईप्रमाणेच रुंजीही दिसायला निरागस, सुंदर आहे.
7 / 7
प्रतिक्षा यांनी लेकीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यामध्ये रुंजीने लक्ष वेधून घेतलं आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजन