Join us

'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीने उलगडली तिची लव्ह लाईफ; म्हणाली, "सध्या लग्नसंस्था.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 16:12 IST

1 / 8
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठीतली चाहत्यांची सर्वात लाडकी अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ते आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं.
2 / 8
कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याची चाहत्यांना उत्सुकता असतेच. तसंच प्राजक्ता माळी लग्न कधी करणार? तिचा बॉयफ्रेंड कोण आहे? असे प्रश्न प्राजक्ताच्या चाहत्यांना पडलेले आहेत.
3 / 8
नुकतंच प्राजक्ताने 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या लव्ह लाईफचा उलगडा केला. सध्याच्या लग्नसंस्थेवरही तिने भाष्य केलं.
4 / 8
प्राजक्ता म्हणाली, 'मी प्रेमात पडते पण मला लग्न, कमिटमेंट याची भीती वाटते. मला स्वत:सोबतच राहायला आवडतं. मला एकटं जगायला आवडतं. मी आतापर्यंत स्वतंत्र आयुष्य जगत आली आहे. २०१३ पासून मुंबईत एकटी राहत आहे. त्या स्वातंत्र्याची खूप सवय लागली आहे.'
5 / 8
'कलाकार म्हणून मी खूप मोकळ्या मनाची आहे. त्यामुळे कोणत्याही बंधनात अडकण्याचा मला फोबिया वाटतो. आत्ता ज्या पद्धतीने लग्न संस्था विस्कळीत होत चालली आहे जरा भीती वाटते.'
6 / 8
'तसंच मी काही तेवढीही प्रेमात नाही पडले. मी पडले पण जेव्हा मला कळलं ही हा पोरगा माती खातोय तेव्हा मी त्याला टाटा टाटा बाय बाय केलं. त्यामुळे सध्या मी सिंगलच आहे. ' असंही ती म्हणाली.
7 / 8
प्राजक्ताने याआधी आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु श्री श्री रविशंकर यांनाही लग्न करणं गरजेचं आहे का? असा प्रश्न विचारला होता. तिचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
8 / 8
प्राजक्ता सध्या खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीच नाही तर सूत्रसंचालिका, नृत्यांगना, कवयित्री, व्यावयासिका आणि निर्माती अशा विविध भूमिका पार पाडत आहे ज्याचं सर्वांनाच कौतुक वाटतं.
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्रारिलेशनशिप