Join us

साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:03 IST

1 / 10
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या चर्चेत आहे.
2 / 10
अलिकडे प्राजक्तानं तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केलीय. काही दिवसांपुर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा झाला आहे.
3 / 10
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज खुटवड असं आहे. प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
4 / 10
साखरपुड्यानंतर प्राजक्ता गायकवाड बालाजीच्या (Tirupati Balaji) दर्शनाला गेली आहे.
5 / 10
प्राजक्ता गायकवाडने तिरुपती बालाजीच्या मंदिरातील दर्शनाचे फोटो (Prajakta Gaikwad Tirupati Balaji Darshan Photos) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6 / 10
प्राजक्ता पाठमोरी उभी असून मंदिराकडे हात जोडून उभी आहे. यावेळी ती पारंपरिक लूकमध्ये दिसली.
7 / 10
अखेर 'खूप वर्षांपासूनची इच्छा...' असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिलं आहे.
8 / 10
यावेळी प्राजक्ताबरोबर तिची आई दिसून आली. प्राजक्तानं आई (Prajakta Gaikwad Tirupati Balaji Darshan With Mother) बरोबर तिने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय.
9 / 10
याआधी प्राजक्तानं होणाऱ्या नवऱ्यासोबत पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतलं होतंं. विठुरायाच्या चरणी दोघेही नतमस्तक झाले होते.
10 / 10
प्राजक्ताचा होणारा पती शंभुराज खुटवड हा राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. तर ते एक पैलवान असून उद्योजकही आहे.
टॅग्स :प्राजक्ता गायकवाडतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट