Join us  

PHOTOS: 12 वर्षानंतर टेलिव्हिजनवरील बालिका वधू दिसते अशी, काही फोटोत ओळखणंही झालंय कठीण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 1:13 PM

1 / 10
'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर आजही आनंदीच्या नावानेच ओळखली जाते. या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली.
2 / 10
बालपणीच अविका टेलिव्हिजनवरील बहू बनली आणि रसिकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली. 
3 / 10
'बालिका वधू' मालिकेनंतर आता अविकामध्ये खूप बदल झाला आहे.
4 / 10
अविका गौरने 2008 साली बालिका वधू मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून अविका स्टार झाली. 
5 / 10
या मालिकेनंतर अविका 'राजकुमार आर्यन' मालिकेत झळकली. या मालिकेत तिने राजकुमारी भैरवीच्या बालपणीची भूमिका केली होती.
6 / 10
'बालिका वधू' नंतर अविका गौरची 'ससुराल सिमर का' ही मालिका चर्चेत आली होती. या मालिकेत तिने विवाहित महिलेची भूमिका केली होती.
7 / 10
'ससुराल सिमर का' मालिकेदरम्यान अविका वयाने लहान होती. कमी वयात अविकाने विवाहित सूनेची भूमिका साकारल्यांमुळे खूप टीका झाली होती. 
8 / 10
'ससुराल सिमर का' या मालिकेनंतर अविकाने बऱ्याच रिएलिटी शोजमध्ये सहभाग घेतला होता.  'बॉक्स क्रिकेट लीग सीझन 2', 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन 9' मध्ये ती झळकली होती.
9 / 10
अविकाने चित्रपटातदेखील काम केले आहे.
10 / 10
अविका सोशल मीडियावर खूप सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यात खूप बदल झाल्याचे पहायला मिळते.
टॅग्स :टेलिव्हिजन