1 / 10मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अनघाने या पात्रानेदेखील अल्पावधीतच घराघरात पोहचली आहे.2 / 10अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahnagade) हिने साकारली आहे.3 / 10अश्विनी महांगडेला अनघाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील तिची अरुंधतीसोबत असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते.4 / 10अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.5 / 10नुकतेच अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात तिने वन शोल्डर वन पीस परिधान केला आहे. 6 / 10या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.7 / 10अश्विनी महांगडेचे गाउनमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 8 / 10अश्विनी महांगडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेतील तिच्या अनघाच्या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे.9 / 10या मालिकेच्या आधी ती 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.10 / 10याशिवाय अश्विनी महांगडे हिने अस्मिता मालिकेत काम केले आहे. तसेच तिने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.