By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:26 IST
1 / 9२००५ साली रिलीज झालेल्या पक पक पकाक (Pak Pak Pakak) चित्रपटात साळूची भूमिका अभिनेत्री नारायणी शास्त्री (Narayani Shastri) हिने साकारली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.2 / 9 नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. नारायणी शास्त्रीने क्यूंकी सास भी कभी बहू थी, पिया का घर आणि लाल बनारसी यांसारख्या अनेक उत्तम मालिकांमध्ये काम केले आहे. 3 / 9२०१५ मध्ये नारायणीने तिचा बॉयफ्रेंड स्टीवन ग्रेव्हरसोबत लग्न केले. तिचा पती ब्रिटीश नागरिक आहे आणि अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. 4 / 9नारायणी शास्त्रीच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही ते पालक होण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसत आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नारायणी म्हणासी, 'आम्हाला मूल नकोय हा आमचा जाणीवपूर्वक निर्णय आहे.' अभिनेत्रीच्या या वक्तव्याने सगळेच हैराण झाले आहेत.5 / 9यावर नारायणी शास्त्री पुढे म्हणाली की, 'मुलांना जगात आणणे ही बाब नाही तर त्यांच्यामध्ये गुंतवणूक करून त्यांना चांगला माणूस बनवण्याचाही मुद्दा आहे. अशा अनेक महिला आहेत ज्या कामासोबतच त्यांची काळजीही घेतात. पण माझ्यासाठी हे खूप कठीण आहे आणि मला त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही.'6 / 9नारायणी शास्त्री याविषयी पुढे बोलताना म्हणाली, मी स्वतःशी खूप प्रामाणिक आहे. मी कोणाला काही सिद्ध करण्यासाठी काहीही करत नाही. 7 / 9लग्न झाल्यावर मी माझ्या पतीसोबत पालकत्वाबद्दलही बोलले. माझ्याकडे पाळीव प्राणी आहेत जे मला खूप आवडतात आणि म्हणूनच मी या टप्प्याचा आनंद घेत आहे पण हा माझा निर्णय आहे, असे ती म्हणाली.8 / 9नारायणीने २००० साली तिच्या सिनेकरिअरला सुरुवात केली. 'कहानी सात फेरे की'मध्ये नारायणी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली. यानंतर, ती एकामागून एक अनेक मालिकांचा भाग बनली आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाडण्यात यशस्वी झाली. 9 / 9'घाट', 'मुंबई मेरी जान' आणि 'चांदनी बार' यांसारख्या चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. हिंदी मालिकेत काम करत असली तरी मराठी ही भाषाही तिला चांगलीच अवगत होती. पक पक पकाक नंतर ऋण या आणखी एका मराठी चित्रपटात तिने प्रमुख भूमिका केली.