Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ समथान, उदय चोपडा आणि पूनम पांडेयच नाहीतर लोकप्रिय सेलिब्रेटींनी धुडकावली 'बिग बॉस'ची ऑफर,प्रत्येकाची आहे वेगवेगळी कारणं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:00 IST

1 / 13
एव्हलिन शर्माला या शोसाठी बर्‍याच वेळा ऑफर्स आल्या आहेत, पण ती जास्त वेळ एकाच ठिकाणी राहू शकत नाही, यामुळे तिला या शोचा भाग व्हायचं नाही.
2 / 13
ऐश्वर्या सखुजाला शोची कंसेप्टच खूप आव्हानात्मक वाटते.या कारणामुळेच तिला या शोमध्ये यायचे नाही असे सांगितले होते.
3 / 13
टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सुरवीन चावला यांनी शोचा नववा सीझन नाकारला आणि सांगितले की तिला या शोमध्ये कधीच यायचे नाही.
4 / 13
नेहा धुपिया तिच्या बेधडक अंदाजामुळे चर्चेत असते. ख-या आयुष्यात रोखठोक बोलणारी नेहाला अनेकदा शोसाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र शोचा फॉर्मेट तिला आवडत नाही म्हणून तिनेही शोला नकार दिला होता.
5 / 13
आपल्या स्टाईलने लोकांना आकर्षित करणारी पूनम पांडेसुद्धा या शोसाठी संपर्क करण्यात आला होता. तिने थेट 3 कोटींपेक्षा जास्त मानधन देण्यात यावी मागणी केली होती.
6 / 13
टीव्ही अभिनेता पार्थ समथनला बिग बॉस 10 साठी ऑफर करण्यात आल होते. पण विकास गुप्ताबरोबरचा त्यांचा वाद पुन्हा एकदा समोर येणार अशी भीती त्याला होती. या भीतीमुळे त्याने नकार दिला होता.
7 / 13
हनी सिंगची लोकप्रियता पाहून सेलेब्रिटींनी त्याला पुन्हा पुन्हा हा शो ऑफर केला. हनी सिंगने प्रत्येक वेळी या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.
8 / 13
काही वर्षांपूर्वी कबीर बेदी या शोचा एक भाग होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ही बातमी केवळ अफव असल्याचे सांगितले होते. या वृत्ताबद्दल ते मीडियावरही चिडले होते. निर्मात्यांनाही त्यांनी नकार दिला होता.
9 / 13
करणसिंग ग्रोव्हरने या शोमध्ये अनेकदा प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे. स्पर्धक म्हणून यायचे नसल्याचे सांगत नकार दिल्याचे म्हटले होते.
10 / 13
या कार्यक्रमासाठी रणविजय सिंह कित्येकदा संपर्क साधला आहे. रणविजयने 7 ते 8 वेळा या कार्यक्रमाला नाही सांगितले आहे.
11 / 13
गौरव गेराला या शोच्या नवव्या सीझनची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यानेही या शोचा भाग होण्यास नकार दिला.
12 / 13
जॅकी श्रॉफ सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. पण तरीही जॅकीला या शोचा भाग होण्यात जराही रस नाही.
13 / 13
उदय चोपडाने सांगितले होते की, शोचे कंसेप्ट खूप इंटरेस्टींग आहे, पण मी स्पर्धक म्हणून रसिकांचे मनोरंजन करू शकेल इतका आत्मविश्वास माझ्यात नाही. म्हणून वारंवार नकार देत असल्याचेही त्याने सांगितले होते.
टॅग्स :बिग बॉस