By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:43 IST
1 / 10'नवरी मिळे हिटलरला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचे तो ठरवतो. 2 / 10लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवंय जसं जिमी शेरगील रिषितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं. लीलाच म्हणणं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसं प्रपोजलही युनिकच हवं. प्रेमात असंच असत इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात.3 / 10 तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं जिथे छान बर्फ असेल आणि बर्फाच्या मध्ये उभं राहून रोमँटिक डान्स करायचाय आणि तिला एक मस्त शिकारा राईडही करायची आहे. ह्या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय. 4 / 10या सगळ्या शूट बाबत वल्लरी विराजने आपला अनुभव व्यक्त केला. ती म्हणाली की, आम्ही काश्मीरला गेलो होतो तिथे आम्ही ४ दिवस शूट केलं. आम्ही निसर्गमय बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले जसं गुलमर्ग आणि श्रीनगर. तिकडे शूटिंग करण इतकं सोपं नव्हते. कारण प्रचंड थंडी होती. पण बर्फात शूट करायची मज्जा काही वेगळीच होती. 5 / 10आम्ही गुलमर्गला बर्फात एजे-लीलाचा प्रोपोजल सीन शूट केला. गुलमर्ग मध्ये बर्फात साडी नेसून एक गाणं ही शूट केलं गेलं, जो माझ्यासाठी एक मोठा टास्क होता.6 / 10मला साडीत खूप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट होत होता मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होते, असे वल्लरी म्हणाली.7 / 10खासकरून 'नवरी मिळे हिटलरला'ची जी क्रिएटिव्ह आहे मनाली तिने माझी अतिशय काळजी घेतली. 8 / 10एजे म्हणजेच राकेश बापटने ही मला खूप सपोर्ट केले. पण जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिले माझी उत्सुकता तेवढीच वाढत गेली. 9 / 10आम्ही दललेकला शिकारा मध्ये बसूनही शूट केलं तो ही एक छान अनुभव होता. 10 / 10. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील, असे वल्लरी म्हणाली.