Join us
Daily Top 2Weekly Top 5

MC Stan Shoes : एमसी स्टॅनला सानिया मिर्झाकडून मिळालं लाखोंची गिफ्ट्स, रॅपर म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:58 IST

1 / 7
'बिग बॉस १६' ची ट्रॉफी जिंकल्यापासून एमसी स्टॅनचा फॅन फॉलोइंग आणखी वाढला आहे. अनेक बड्या कलाकारांपेक्षा त्याचा फॅन फॉलोइंग मोठा आहे.
2 / 7
बिग बॉस जिंकून तो बाहेर आल्यानंतर अनेक ठिकाणी स्टॅनला बोलावण्यात आलं होतं. तसंच स्टॅननं अनेक कॉन्सर्टही केले, ज्यामध्ये त्याचे बिग बॉसचे मित्रही सहभागी झाले होते.
3 / 7
या शोनंतर त्याला अनेक भेटवस्तूही मिळाल्या. पण आता त्याला मिळालेलं गिफ्ट खूप खास आहे. यावेळी स्टेनला सानिया मिर्झाकडून एक महागडी आणि आलिशान भेट मिळाली आहे. टेनिसपटू सानिया मिर्झाकडून खास भेट मिळाल्यानंतर स्टॅननं आनंद व्यक्त केला आहे.
4 / 7
विशेष म्हणजे टेनिस स्टार सानिया मिर्झानं पुण्यातील रॅपर एमसी स्टॅनला १.२१ लाख रुपयांची गिफ्ट दिली आहेत. यामध्ये सानिया मिर्झानं त्याला शूज आणि चष्मा दिला आहे.
5 / 7
भेटवस्तूंमध्ये ९१ हजार रुपये किमतीचे ब्लॅक कलरचे nike चे शूज आणि ३० हजार रुपये किमतीचे सनग्लासेसचा समावेश आहे. एमसी स्टॅननं सानिया मिर्झाचे काही अतिशय सुंदर कॅप्शनसह आभार मानले आहेत.
6 / 7
एमसी स्टॅनने सानिया मिर्झाकडून मिळालेल्या भेटवस्तूचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने तिला 'आपा' (मोठी बहीण) असं म्हणत मारून तिचे आभार मानले. तसंच तेरा घर जाएगा इसमे असंही फोटोसोबत त्यानं लिहिलंय.
7 / 7
एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा फराह खानच्या मुंबई पेंटहाऊसमध्ये बिग बॉस १६ च्या पोस्ट-फिनाले पार्टीमध्ये भेटले होते. यानंतर त्यांच्यात मैत्रीही झाली. विशेष म्हणजे, स्टॅनने सानिया मिर्झाच्या हैद्राबाद येथे टेनिस रिटायरमेंट बॅशमध्येही परफॉर्म केलं होतं.
टॅग्स :बिग बॉससानिया मिर्झा