Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेली 'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया? आता काय करते माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:46 IST

1 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको' ही झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका. नावामुळेच ही मालिका चर्चेत आली होती.
2 / 8
मालिकेत अनिता दाते केळकर, अभिजीत खांडकेकर आणि रसिका सुनील यांच्या मुख्य भूमिका होत्या. अनिताने राधिकाची भूमिका साकारली होती. तर अभिजीत गुरूनाथच्या भूमिकेत होता.
3 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया प्रेक्षकांना खूपच आवडली होती. शनायाच्या भूमिकेत रसिका सुनील होती. या भूमिकेने रसिकाला प्रसिद्धी मिळवून दिली.
4 / 8
रसिकाने जवळपास ४ वर्ष मालिकेत काम केलं. नंतर तिने मालिका सोडली होती.
5 / 8
२०२१ मध्ये रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्न करत संसार थाटला आहे. तिचा नवरा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
6 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर रसिका काही सिनेमांमध्ये दिसली. गर्लफ्रेंड, बघतोस काय मुजरा कर, उर्मी, बस स्टॉप, फकाट, तुला कळणार नाही या चित्रपटांत तिने काम केलं आहे.
7 / 8
रसिका सध्या दोन वाजून बावीस मिनिटांनी या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
8 / 8
रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.
टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोरसिका सुनिलटिव्ही कलाकार