'शरीर प्रदर्शन ही...', शर्टचं बटण उघडं ठेवून बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 19:49 IST
1 / 11छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया गुरवने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 11तिने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.3 / 11 लव्ह लग्न लोचा या मालिकेतून अक्षया घराघरात पोहचली.4 / 11अक्षया गुरव सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. 5 / 11अक्षया गुरव बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. 6 / 11दरम्यान नुकतेच अक्षयाने बोल्ड फोटोशूट केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.7 / 11या फोटोशूटमध्ये तिने व्हाईट रंगाचे शर्ट घातले आहे, पण त्याची बटणं उघडी ठेवली आहेत.8 / 11अक्षयाला या फोटोशूटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.9 / 11अनेकांनी तिच्या या फोटोवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 10 / 11एका युजरने म्हटले की, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकरांना काम मिळत नाही, तेव्हा ते शरीर प्रदर्शन करुन चर्चेत येण्याचा व काम मिळवण्याचा प्रयत्न करतात.11 / 11तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अक्षया शरीर प्रदर्शन ही फॅशन नसून विकृती आहे. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यात आज तुही योगदान दिलं आहेस.