By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:38 IST
1 / 7स्टार प्रवाह वाहिनीवर १९ जानेवारी २०२६ पासून तुझ्या सोबतीने ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. 2 / 7मालिकेचं आगळंवेगळं कथानक आणि कलाकारांचं काम प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे.3 / 7 मालिकेत अभिनेत्री एतशा सांझगिरी आणि अजिंक्य ननावरे हे दोन फ्रेश चेहरे पाहायला मिळत आहेत.4 / 7 नुपूरच्या नावाच्या मुलीच्या अवतीभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. ही व्यक्तिरेखा एतशा संझगिरी साकारते आहे. मालिकेत तिने साकारलेली साधी, सुसंस्कृत आणि समजूतदार असणारी नुपूर अनेकांना भावली आहे. 5 / 7'तुझ्या सोबतीने' मालिकेत नुपूरची भूमिका साकारणारी एतशा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच सुंदर दिसते.6 / 7 सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.7 / 7एतशाचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यावर कोणीही घायाळ होईल एवढी ती ग्लॅमरस आणि सुंदर आहे.