Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर अँड मिसेस घरत! दिव्या पुगावकरने शेअर केले लग्नातील Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:38 IST

1 / 8
'मुलगी झाली हो', मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमधून अभिनेत्री दिव्या पुगावकर घराघरात पोहोचली.
2 / 8
सध्या दिव्या झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करताना दिसते. या मालिकेत ती जान्हवी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
3 / 8
सध्या दिव्या तिच्या अभिनयामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिचा प्रियकर अक्षय घरतसोबत लग्नगाठ बांधली.
4 / 8
नुकतेच दिव्या पुगावकरने तिच्या लग्नातील सुंदर असे अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 8
दिव्याने सोशल मीडियावर तिचे आणि पती अक्षयचे लग्नातील खास फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 8
'हॅलो फ्रॉम मिस्टर अॅंड मिसेस घरत...' असं कॅप्शन देत तिने नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.
7 / 8
दिव्याने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केला होता. पिवळ्या रंगाची सुंदर साडी, त्यावर लाल रंगाची शाल, गळ्यात सुंदर नेकलेस, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या नववधूच्या लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत होती. तर अक्षयने पांढरी शेरवानी परिधान केली होती.
8 / 8
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं तर, अक्षय घरत हा एक फिटनेस मॉडेल आहे. त्याचबरोबर तो न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर सुद्धा आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया