By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:00 IST
1 / 6झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'शिवा' (shiva marathi serial) ही सध्या TRP च्या शर्यतीत आघाडीवर आहे. हटके कथेमुळे सुरुवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.2 / 6'शिवा' मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेत शिवाची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक-फडके चर्चेत आहे.3 / 6'शिवा' मालिकेत पूर्वाची भूमिका बिनधास्त 'टॉमबॉय' स्टाइल आहे. साध्याभोळ्या, शांत आणि सोज्वळ सूनेच्या पारंपरिक भूमिकेला छेद देणारी डॅशिंग मुलगी असा तिचा मालिकेतला रोल आहे.4 / 6पडद्यावर 'टॉमबॉय' लूकमध्ये दिसणारी पूर्वा ही खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड, बिनधास्त दिसते. सोशल मीडियावर तिने नुकताच फोटोशूट पोस्ट केलाय. त्यातला तिचा वेगळा लूक चर्चेत आहे.5 / 6पूर्वाचा ताजा फोटोशूट खूपच बोल्ड अन् बिनधास्त आहे. या फोटोशूटमध्ये पूर्वा काळ्या रंगाचा लाँग शर्ट घालून बेडवर बसल्याचे दिसतेय. पांढऱ्या बेडशीटवर काळ्या रंगाचा शर्ट ही कलर स्कीम उठून दिसते.6 / 6फोटोशूटमधील पूर्वाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच बोलके आहेत. तसेच, तिच्या हेअरस्टाइलकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. 'ए इश्क है' असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे.