Join us
Daily Top 2Weekly Top 5

PHOTOS : ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेमधील बयोची ‘आई’ आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 16:52 IST

1 / 9
सोनी मराठी वाहिनी कायमच नवनवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. कालपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नाव अर्थातच तुम्हाला ठाऊक आहेच. मालिकेचं नाव आहे, ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’
2 / 9
शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस... असं म्हणत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील बयोच्या आईला तुम्ही ओळखलंत? आज आम्ही तिच्याच बद्दल सांगणार आहोत.
3 / 9
बयोच्या आईची भूमिका अभिनेत्री वीणा जामकर हिने साकारली आहे. मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ही तिची पहिली मालिका.
4 / 9
अनेक वर्षे सिनेमा आणि रंगभूमी यांद्वारे आपली यशस्वी कारकिर्द घडवलेली अभिनेत्री वीणा जामकर मालिकेत अगदी साध्या लुकमध्ये दिसतेय. तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय.
5 / 9
वयाच्या 5 व्या वर्षांपासून वीणा अभिनय करतेय. एकांकिका, नाटक करता करता ती सिनेमात आली आणि नावारूपास आली. आज वीणा एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
6 / 9
वीणाच्या अभिनय प्रवासात तिच्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे. वीणाला अभिनयात गती आहे, हे समजल्यावर त्यांनी तिच्या या गुणावर सर्व लक्ष केंद्रीत केलं. तिला वेगवेगळ्या बालनाट्य शिबीरात नेण्यापासून तिच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी खंबीर साथ दिली.
7 / 9
रूपारेल कॉलेजात असताना तिची नाट्य कारकिर्द बहरत होती. याच काळात द्वितीय वर्षाला असताना तिला सिनेमाची आॅफर आली. ‘बेभान’ हा तिचा पहिला सिनेमा. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
8 / 9
‘लालबागची राणी’ हा वीणाचा सिनेमा प्रचंड गाजला होता. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.
9 / 9
‘गाभ्रीचा पाऊस’ या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. समीक्षकांनी तिच्या भूमिकेला चांगलीच दाद दिली होती. ‘वळू’मधील तिची भूमिकाही गाजली.
टॅग्स :वीणा जामकरसोनी मराठीटेलिव्हिजनमराठी अभिनेता