Photos: मराठी टीव्ही 'स्टार' कपलचं सुंदर प्री वेडिंग फोटोशूट, लवकरच बोहल्यावर चढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:03 IST
1 / 8सध्या टीव्ही मनोरंजनविश्वात अनेकांची लग्नाची लगबग सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच रेश्मा शिंदेने थाटात लग्नगाठ बांधली. शिवाय अभिनेत्री कौमुदी वालोकरचंही नुकतंच लग्न झालं2 / 8 तर आता आणखी एक मराठमोळं कपल लग्नाच्या बेडीत अडकत आहे. त्यांच्या प्री वेडिंगचे फोटोही समोर आले आहेत. यामध्ये दोघंही खूपच गोड दिसत आहेत.3 / 8हे कपल 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar)आणि 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळे (Ambar Ganpule) लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.4 / 8शिवानी आणि अंबरच्या घरी तयारीला सुरुवात झाली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर ते सतत याविषयी अपडेट देत असतात.5 / 8आता त्यांनी आपलं प्री वेडिंग फोटोशूट नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. बेबी पिंक रंगाच्या साडीत शिवानी खूपच सुंदर दिसत आहे तर अंबरने गुलाबी रंगाचाच शर्ट घातला आहे. 6 / 8निसर्गाच्या सान्निध्यात एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांनी केलेलं हे फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी याचा व्हिडिओही अकाऊंटवर शेअर केला आहे.7 / 8गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. 8 / 8शिवानी नुकतीच 'तू भेटशी नव्याने' मालिकेत दिसली. तर अंबर 'दुर्गा' या मालिकेत दिसला.