Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामध्ये वडील गेले, खचून न जाता आईला बनवलं रीलस्टार; प्रथमेश कदमची अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:08 IST

1 / 12
मराठमोळा कंटेट क्रिएटर आणि रीलस्टार प्रथमेश कदमचं २६ जानेवारीला निधन झालं. प्रथमेशच्या अचानक झालेल्या एक्झिटने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
2 / 12
गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये असतानागी तो रील बनवून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता.
3 / 12
त्यामुळेच त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांसोबत कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम ही मायलेकाची जोडी लोकप्रिय होती.
4 / 12
प्रथमेश आणि त्याच्या आईचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरं तर प्रथमेशनेच त्याच्या आईला रीलस्टार बनवलं होतं.
5 / 12
आईची नृत्याची आवड पाहून त्याने तिच्यासोबत काही टिकटॉकवर रील बनवले होते. त्यानंतर इन्स्टावरही या मायलेकाच्या जोडीला प्रसिद्धी मिळाली होती.
6 / 12
करोनामध्ये प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा प्रथमेशने संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली होती.
7 / 12
प्रथमेशच्या निधनानंतर त्याला नक्की काय झालं होतं? याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. त्याच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
8 / 12
पण, प्रथमेशची मैत्रीण असलेल्या सई उतेकर हिने त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिने म्हटलं होतं की 'खूप जणांचे फोन आणि मेसेजेस आले. खूप जणांना प्रश्न पडला आहे की नक्की काय झालं? प्रथमेशला अचानक काय झालं?'
9 / 12
'तू खूप हेल्दी आणि चांगला होता. सगळे स्टोरी टाकत आहेत की त्याचं निधन झालं. खूप जणांना धक्का बसलाय. काही जणांना विश्वासही बसत नाहीय . चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत'.
10 / 12
ती पुढे म्हणाली 'एक महिन्यांपासून प्रथमेश हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता . त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. त्याच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं'.
11 / 12
'पोटातील इन्फेक्शन जाण्यासाठी आणि तो पूर्ण बरं होण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. प्रथमेश च्या घरच्यांनीही शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. पण ते त्याला नाही वाचवू शकले'.
12 / 12
प्रथमेश एक कंटेट क्रिएटर असण्यासोबतच डान्सर आणि कोरिओग्राफरही होता. अनेक अल्बम साँगमध्ये तो दिसला होता.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी