तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:03 IST
1 / 9तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तेजश्री 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 2 / 9या मालिकेत तेजश्री स्वानंदीची भूमिका साकारत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीच्या लग्नासाठी घरातले मुलगा शोधत आहेत. 3 / 9लग्नाचं वय निघून गेल्यानंतर आता लग्न कोण करणार? असा प्रश्न स्वानंदीला पडला आहे. 4 / 9पण, खऱ्या आयुष्यात तेजश्रीचं वय किती? आणि सुंदर दिसण्यासाठी तेजश्री काय करते? हे तुम्हाला माहितीये का? 5 / 9तेजश्रीने खऱ्या आयुष्यात तिशी पार केली आहे. तिचं वय ३७ वर्ष आहे. 6 / 9चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेली तेजश्री अजूनही तरुण दिसते. तिचं ब्युटी सिक्रेट माहितीये का? 7 / 9तेजश्री तिच्या फिटनेस आणि स्किन केअर रुटीनकडे लक्ष देताना दिसते. तेजश्री रोज व्यायाम करते. 8 / 9यासोबतच ती पौष्टिक आहारही घेते. तिच्या आहारात तेजश्री ताज्या फळांच्या रसाचा समावेश करते. 9 / 9चेहऱ्यासाठी तेजश्री नैसर्गिक उपाय करते. केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स ती जास्त वापरत नाही. यापेक्षा ती घरगुती उपाय वापरते.