Join us

श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:37 IST

1 / 9
दरवर्षी सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरी करतात. मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेनेही यंदा करवा चौथ साजरी केली.
2 / 9
करवा चौथ सेलिब्रेशनचे काही खास फोटो श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
3 / 9
अभिनेत्रीने करवा चौथसाठी खास लाल रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं.
4 / 9
श्वेता शिंदे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
5 / 9
अभिनेत्री असण्याबरोबरच श्वेता एक उत्तम निर्मातीदेखील आहे. लागिर झालं जी, अप्पी आमची कलेक्टर,देवमाणूस, लाखात एक आमचा दादा अशा मालिकांची निर्मिती तिने केली आहे.
6 / 9
श्वेताप्रमाणेच तिचा नवरा देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचं नाव संदीप भन्साळी असं आहे. 'वो रेहनेवाली मेहलों की' ,'ईश्वर साक्षी', 'क्रिस और क्रीष्णा', 'मोहिनी', 'प्यार के दो नाम', 'एक राधा एक श्याम' या गाजलेल्या मालिकेत त्याने काम केलं आहे.
7 / 9
'अपराधी कौन' या मालिकेदरम्यान श्वेता आणि संदीप यांच्यातील प्रेमसंबंध फुलले. २००७ साली लग्नाच्या बेडीत अडकून त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली.
8 / 9
संदिप भन्साळी आता अभिनय क्षेत्रात काम करत नसून पुण्यामध्ये तो कपड्यांचा बिझनेस करतो. पुणेच नाही तर साताऱ्यातही त्यांचा व्यवसाय आहे.
9 / 9
'हरी ओम साडी डेपो' नावाने कपड्यांचे भलेमोठे शोरुमचा संदिप भन्साळी मालक आहे. अभिनय सोडून संदिप भन्साळी एक उत्तम बिझनेसमन बनला आहे.
टॅग्स :श्वेता शिंदेटिव्ही कलाकार