By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:18 IST
1 / 7मराठमोळी अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्न करणार आहे. लग्नाआधी शिवानीच्या केळवणाला सुरुवात झाली.2 / 7शिवानीच्या घरीच केळवणाला सुरुवात झाली असून शिवानीसाठी घरच्यांनी चमचमीत पदार्थांचा बेत केला होता.3 / 7यावेळी शिवानीच्या घरच्यांनी एका रुमालावर तिची पावलं उमटवली. हा सुंदर फोटो सर्वांच्या पसंतीस उतरला4 / 7शिवानीच्या कुटुंबातील लहान सदस्याने तिचं खास औक्षण केलं. शिवानीचा या लहानग्यासोबत मस्तीखोर अंदाज पाहायला मिळाला5 / 7शिवानीने याप्रसंगी आई-बाबांसोबत खास फोटोशूट केलं. लाडक्या लेकीचं केळवण करताना शिवानीचे आई-बाबा आनंदी असलेले दिसत आहेत6 / 7शिवानीच्या घरच्या केळवणाला तिची आजीही उपस्थित होती. लाडक्या नातीसोबत शिवानीच्या आजीनेही खास फोटो काढले7 / 7शिवानीच्या बाबांनीही लेकीचं केळवण करताना तिचं खास औषक्ष केलं. शिवानी लवकरच तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अंबर गणपुलेसोबत लग्न करणार आहे.