KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:42 IST
1 / 9अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) शोला यावर्षी २५ वर्ष पूर्ण झाले. २५ वर्षांपासून या शोने अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. 2 / 9'कौन बनेगा करोडपती'चा पहिला करोडपती कोण आठवतोय का? २५ वर्षांपूर्वी २००० साली एका मराठी माणसाने १ कोटींची रक्कम जिंकली होती. ते आहेत हर्षवर्धन नवाथे.3 / 9नुकतंच शोला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांनी केबीसीच्या सेटवर हजेरीही लावली होती. या शोमुळे त्यांचं आयुष्यच पालटलं असंही ते यावेळी म्हणाले.4 / 9हर्षवर्धन नवाथे केबीसीच्या सेटवर आपल्या कुटुंबासह गेले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्यांची पत्नी ही मराठीतही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अनेकांना तेव्हा कळलं.5 / 9काही दिवसांपूर्वी 'कमळी' मालिका सुरु झाली. या मालिकेत नयनतारा इनामदारची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सारिका नवाथे हीच हर्षवर्धन नवाथेंची बायको आहे. 6 / 9सारिका नवाथे मराठी इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून काम करत आहे. चाणक्य, जास्वंदी या नाटकांत सारिकानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दूरदर्शनवरील गुलाम-ए-मुस्तफा या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. 7 / 9२०१२ मध्ये आलेल्या अजिंक्य या सिनेमातही सारिका झळकली होती. पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर या सिनेमात सारिका अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं होतं. 8 / 9सारिका आणि हर्षवर्धन यांचे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. आईवडिलांनीच हर्षवर्धन यांच्यासाठी सारिकाची निवड केली. २००७ साली ते लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. 9 / 9हर्षवर्धन नवाथेंबद्दल सांगायचं तर वयाच्या २७ व्या वर्षीच ते केबीसी मध्ये करोडपती झाले. याच पैशांतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ते लंडनमध्ये शिकायला गेले. भारतात आल्यानंतर त्यांनी त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलं. आज ते ५२ वर्षांचे असून JSW ग्रुपचे सीईओ आहेत.